ह्या वळणार

ह्या वळणावर येण्याचे मला फार कौतूहल होते.

पण ह्या वळणावर मी येइन असे ही कधी वाटला नव्हता.

ह्या वळणावर येऊन पुढे बघव की मागे ही दुविधा होईल असे वाटले नव्हते.

ह्या वळणावर आपण इतक्या लवकर येओ असे ही वाटले नव्हते.

ह्या वळणावर मन इतके हलके होईल असे कधीच वाटले नव्हते.

ह्या वळणाच्या पुढे काय आहे ही बघण्याची ईछा तर नाही.

पण ह्या वळणाच्या मागे बाघ्यणाची हिंमत ही होत नाही.

ह्या वळणावर कोण आपले कोण परके ह्याची जाणीव नाही.

पण ह्या वळणावर कोणाला विचारावे असे ही कोणी नाही.

ह्या वळणावर दुक्खा ने डोळे पाणावलेले ही नाहीत पण डोळ्यात आनंदाचे अश्रू ही नाहीत.

ह्या वळणावर मनात खूप इच्छा ही आहेत पण त्या पूर्ण ना होण्याची भीती ही आहे.

ह्या वळणावर ढग दाटून आलेले नाहीत पण हवी तशी सूर्याची उब ही नाही.

ह्या वळणावर दरी ही नाही पण डोंगर ही नाहीत.

 

ह्याच वळणावर दोन पावले पुढे गेले आणि हे मी काय बघतेय….. वळण तेच पण चित्र पलट आहे….

IMG_0273.JPG

 

ह्याच वळणावर उभे राहून वाट स्पष्ट दिसतेय.

ह्या वळणावर एका बाजूला सुंदर विचारांची सखोल दरी आहे तर दुसर्या बाजूला भक्कम आधार देणारे डोंगर आहेत.

ह्या वळणावर मन शांत करणारा थंड मधुर वारा आहे आणि मनाला उब देणारे कव्ले उन ही आहे.

ह्या वळणावर येणार्‍या समृद्धी च्या पावसाचे ढग आहेत पण आहे ती समृद्धी ही कमी वाटत नाही.

ह्या वळणावर आपल्या कडे सगळे आहे असे ही वाटते.

पण ह्या वळणावर आपण एकटे असल्याची जाणीव ही होते.

ह्या वळणावर कोणीची तरी साथ हवी असे ही वाटते.

पण ह्या वळणा वरुन आपण एकटे पुढे जाउ इतके धैर्य ही आहे.

ह्या वळणार मनाचा ताबा सुटेल असे वाटते पण मनाला सावरता येईल याची ही खात्री आहे.

ह्या वळणावर भौतिक गोष्टींचा मोह ही आहे पण तो क्षणिक असण्याची जाणीव ही आहे.

ह्या वळणावर प्रेमावर विश्वास ही आहे पण ते क्षणिक आहे का अशी शंका ही आहे.

हे वळण जितके सुंदर आहे तितके कठीण ही आहे.

पण ह्या वाळणार मी आले ह्याचा आनंद ही आहे….

ह्या वळणावरून मी पुढे कधी आणि कुठे जाईन ह्याची चिमुट भर कल्पना ही मला नाही पण ह्या वळणावरून मी भरकटणार नाही ह्याची खात्री ही आहे.

तुम्ही पोचलात का तुमच्या “ह्या वळणावर”?

IMG_0365.JPG

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s